'यशार्थ' - लक्ष्य मराठी उद्योजक घडवण्याचे
- नमस्कार,
- आपली संघटना, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात MCC. मराठी उद्योजक-व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्कर्षासाठी अविरत प्रयत्न करत आहे.
- संस्थेच्या माध्यमातून आपण विविध योजना राबविल्या आहेत . ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’सारखे व्यापारी- उद्योजकांसाठी हक्काचं एक व्यासपीठ निर्माण केलं आहे.
- आज संघटनेला ४४ वर्ष पूर्ण होत असताना संघटनेने मराठी उद्योजकांची एक नवीन पिढी घडवण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.
- मराठी व्यक्तीला उद्योग करता येत नाही, मराठी व्यक्ती उद्योग व्यवसायात टिकू शकत नाही, असं नेहमीच हिणवलं जातं. परंतु खऱ्या अर्थाने घरात व्यवसाय-उद्योगाला पूरक वातावरण नसणे, व्यवसायवृध्दीसाठी योग्य मार्गदर्शन नसणे, विचारात सुसूत्रता नसणे, भविष्याची शाश्वती नसणे, अशी त्यामागची मुख्य कारणे आहेत.
- असं असलं तरी गेली अनेक दशकं मुंबई- महाराष्ट्रच नाही तर देशाच्या उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रावर अनेक दिग्गज मराठी उद्योजकांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
- अशा उद्योजकांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्रातील तरूणाईने पुढे न्यावी, उद्योजकांची एक नवी पिढी घडावी यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने होतकरू मराठी व्यावसायिक , उद्योजकांसाठी 'यशार्थ' या उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केलं आहे.
- ही कार्यशाळा एकूण १३ महिन्यांची असेल. पहिल्या मार्गदर्शनपर सत्रात (Introductory) कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि रोड मॅप यावर सविस्तर माहिती दिली जाईल.
- त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी प्रत्येकी तीन तासांचं १ सत्र आयोजित केले जाणार आहे. अशी सलग १२ सत्रे घेण्यात येतील. एकूण ३९ तासांच्या या कार्यशाळेद्वारे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मराठीजनांची मानसिकता तयार करण्यासोबतच, त्यांना प्रोत्साहीत केलं जाईल. तसंच व्यवसायाचे प्रभावी नियोजन कसे करावे,व्यवसायाचे अर्थकारण कसे हाताळावे, तसंच लक्ष्यपूर्तीसाठी विचार-कृतीत सुसूत्रता आणावी याचे मार्गर्शन करण्यात येईल. सेल्स- मार्केटिंग म्हणजे काय? ते कसे करावे? ग्राहकाभिमुख व्यवसाय कसा उभा करावा? व्यवसायात येणाऱ्या आव्हानांना तोंड कसं द्यावं याचेही धडे देण्यात येतील.
- नेतृत्वगुण वाढीसाठी व परस्पर सहकार्य भावनेने काम करण्याची सवय लागावी यासाठी कार्यशाळेत विशेष प्रयत्न केले जाणार आहेतं.
- ‘यशार्थ’ या कार्यशाळेला आंतरराष्ट्रीय किर्तीचे बिझनेस कोच श्री. सचिन कामत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून ही कार्यशाळा मराठी भाषेतून असेल.
- श्री. सचिन कामत यांच्या कार्यशाळेसाठी प्रति सदस्य ₹.१.५० लाख इतके शुल्क आकारतात. मात्र तीच उद्योजक घडवणारी कार्यशाळा आपण MCC मार्फत अवघ्या ₹.३,५००/- रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. यासाठी प्रायोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
- पहिल्या बॅचमध्ये फक्त १०० जणांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे. मराठी तरुण-तरूणींनी उद्योग व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेऊन रोजगार-स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध कराव्यात आणि मराठी उद्योग-व्यवसायाची पताका सातासमुद्रापार फडकवावी, या उदात्त हेतूने मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने हे एक सकारात्मक पाऊल उचललं आहे.
- नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे किंवा स्वतःचा व्यवसाय अधिक जोमाने वाढवू इच्छिणारे असे कोणीही मराठीजन या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. यासाठी वयाची अट नाही. तसेच कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी MCC चे सदस्यदेखील असण्याची अट नाही.
- मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रत्येक सदस्याने यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे. हा मेसेज आपल्या परिचयातील किमान १०० मराठी व्यक्तींपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण या महाराष्ट्राचं काही देणं लागतो या उद्देशाने मराठी नव उद्योजक घडवण्यासाठी आपल्यातर्फे किमान २ तरुण अथवा तरुणींना या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी उद्युक्त करावे.
- ही या महाराष्ट्र प्रति असलेली आपली एक समर्पित भावना समजावी.
- हि कार्यशाळा कोणासाठी
- * उद्योजक
- * उद्योगात येण्यास उत्सुक असणारे तरुण
- * शिक्षण पूर्ण झालेले मराठी होतकरू तरुण
- * सध्या नोकरी करीत असलेले आणि उद्योग करू इच्छिणारे
- कार्यशाळेचे प्रथम (Introductory) सत्र:
- दिनांक १८ जुलै २०२४
- कार्यशाळेचे स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक , शिवाजी पार्क, दादर, मुंबई - ४०००२८.
- वेळ: सायंकाळी ४ ते ८ वाजता
- ( फक्त पहिल्या ओळख सत्राचे (Introductory) शुल्क: ₹. १९९/- फक्त )
- अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
- महेश बापट : 9820315260
- सोनाली : 89281 75018
- धन्यवाद 🙏🏻
