UpComing Events

मराठी उद्योजकांना जागतिक व्यापारात संधी;
चीनच्या स्वारीसाठी सज्ज व्हा!

मुंबई: मराठी चेंबर ऑफ कॉमर्स २००८ पासून महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांना हॉंगकॉंग आणि चीनमधील व्यापारी प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या व्यापारी सहलींचा आतापर्यंत काही हजार मराठी उद्योजकांनी लाभ घेतला आहे. या सहलींचा उद्देश फक्त व्यापार विस्तार नसून जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी असलेल्या चीनमधील कॅन्टोन फेअर सारख्या भव्य प्रदर्शनांचा अभ्यास करून नव्या संधी शोधणे हा आहे.

चीनमधील कॅन्टोन फेअर

चीनमधील कॅन्टोन फेअर हे १९५७ पासून सुरू झालं असून, ते आज जागतिक व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे. सुमारे सव्वा कोटी चौरस फुट क्षेत्रफळावर उभारलेल्या या प्रदर्शनात ५९ हजारांहून अधिक स्टॉल्स असतात आणि लाखो प्रकारची उत्पादने येथे प्रदर्शित केली जातात. दरवर्षी १५० पेक्षा अधिक देशांतील ३ लाखांहून जास्त उद्योजक या प्रदर्शनाला हजेरी लावतात.

मराठी उद्योजकांचा सहभाग

मराठी उद्योजकांचा, विशेषतः तरुण आणि नवउद्योजकांचा, कॅन्टोन फेअरला वाढता प्रतिसाद मिळत आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणावर तयार उत्पादने, स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्य भारतात आयात करून विक्री केली जाते. या प्रदर्शनामुळे मराठी उद्योजकांना नवीन व्यवसायिक संधी आणि नावीन्यपूर्ण उत्पादने शोधता येतात.

मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रयत्न

मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर आणि संघटन कार्यवाह स्वप्नील राणे यांनी सांगितले की, “मराठी उद्योजकांनी अशा जागतिक प्रदर्शनांमध्ये सहभाग घ्यावा आणि नव्या संधी शोधाव्यात, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.
यंदाची चायना टूर १२ एप्रिल २०२५ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले असून, हे कॅन्टोन फेअर चं यंदाचं हे १३७ वं वर्षं आहे.

यावर्षी फक्त २५ मराठी उद्योजकांना चीनमधील ‘कॅन्टोन फेअर’ ला जाण्याची संधी मिळणार आहे.

चीन आणि भारत यांच्यातील फरक

चीन आज जागतिक व्यापार, उत्पादन, आणि उद्योगात अग्रगण्य आहे. उत्पादनक्षम कामगार, सुव्यवस्थित पुरवठा साखळी आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात हे त्याचे प्रमुख घटक आहेत. मात्र, चीनमधील वाढता कामगार खर्च आणि भारतातील सुधारित व्यापार धोरणे यामुळे भारतीय उद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका

२०१४ नंतर, मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताचा जागतिक व्यापारात सुधारणांचा वेग वाढला आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया , आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांमुळे भारताला जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.

मराठी उद्योजकांसाठी मार्गदर्शन

मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाईल. मराठी उद्योजकांना जगभरातील प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन व्यापाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

भविष्यात भारत चीनला टक्कर देऊ शकतो का?

भारताकडे विपुल मनुष्यबळ, वाढती बाजारपेठ आणि जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता आहे. जर भारतीय उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवली, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारले आणि जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवल्यास, भविष्यात भारत चीनला टक्कर देऊ शकेल.

मराठी उद्योजकांनी या मार्गदर्शनाचा फायदा घेत व्यापार विस्तारासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आले आहे.

त्यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या दादर येथील कार्यालयात संपर्क साधू शकता.

स्वप्निल राणे ( संघटन कार्यवाह )

मराठी चेंबर ऑफ कॉमर्स

202A, 202B, रामकुंज को-ऑप. सोसायटी, आर.के.वैद्य. रोड, दादर (प), मुंबई-400 028.

Translate »
× Chat with us